*रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल च्या भव्य पटांगणावर सुरु झालेल्या कोकण कृषी महोत्सवाला सुरूवात झाली असून या महोत्सवात नाशिक, मुंबई, संभाजी नगर, पुणे, अकोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथून व बेळगाव निपाणी एम पी यू पी येथून स्टॉल धारक सहभागी झाले असून अनेक नामांकित कंपन्याचे स्टॉल या महोत्सवात लागल्याने रत्नागिरीकर उत्स्फूर्त खरेदीचा आनंद घेत आहेत.
तसेच कृषी विषयी बी बियाणे कृषी साहित्य विक्रीचे स्टॉल ही लागल्याने शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. तरी रत्नागिरीकरांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महोत्सव 30 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 11 वाजल्या पासून रात्री 10वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात जनतेला प्रवेश मोफत आहे.













