वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी – डॉ विलास शेळके

खेड : सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये दिवसेंदिवस जंगल तोडी मूळे परिसर भकास होत आहे त्या मुळे अन्नाच्या शोधात वन्य प्राणी थेट मानवी वस्तीमध्ये प्रवेश करून पाळीव जनावरांवर हल्ले करत आहेत यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होत असून त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विलास शेळके यांनी वन विभागाकडे केली आहे.

६ ऑक्टोबर रोजी माणि शिंदेवाडी येथील शेतकरी श्री रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांची दुभती गाय सुमारे २५ हजार रुपये किंमत ची बिबट्या वाघाने ठार केली यामुळे काहीच्या दुधावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट उडवलेले आहे त्यामुळे वनविभागाला नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला यावेळी याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ विलास शेळके बाधित शेतकरी श्री रामचंद्र शिंदे श्री राजेश व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 09/Oct/2024