गुहागर : गुहागर आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशा मागणीचे पत्र शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून दिले होते. त्यावर तत्काळ कार्यवाही होऊन गुहागर आगाराला पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या.
या नवीन गाड्यांचे लोकार्पण आज सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजता आमदार जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुहागर आगारासाठी गेल्या दहा वर्षांत शासनाने नवीन बसेस दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे आगारातील काही बसेस हा खूप जुन्या झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.
याबाबत आ. जाधव यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. गाड्यांच्या मागणीचे नव्याने पत्र देऊन गुहागर आगारातील गाड्यांची स्थिती त्यांना कथन केली. त्याची त्यांनी गांभीयनि दखल घेतली आणि आ. जाधव यांच्या पत्रावर तत्काळ बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असा शेरा मारून ते पत्र ताबडतोब कार्यवाहीसाठी पाठवले. या गाड्यांचे लोकार्पण सोमवारी सकाळी १० वाजता आ. जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 28/Apr/2025









