संगमेश्वर कसबा येथे अजित पवारांच्या ताफ्यावर मधमांशाचा हल्ला..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली. संगमेश्वर येथे मशमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अजित पवारांच्या ताफ्यातील अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले. संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.

मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं.

मधमांशांचा घोंगाट उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ झाली होती. काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मधमाशांच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यात माशाही पाहायला मिळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 28-04-2025