संगमेश्वर : तालुक्यातील कोंडीवरे मोहल्ला येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री अनधिकृतपणे घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ फेब्रुवारीला मध्यरात्री अडीच ते साडेतीनच्या सुमारास घडली.
यासंदर्भातील तक्रार २५ एप्रिलला संगमेश्वर पोलिसात देण्यात आली आहे. मफिद अल फरीद बोरकर (वय २२) आणि अल साहिल ऐजाज काळसेकर (वय ३४, रा. कोंडीवरे मोहल्ला) अशी संशयितांची नावे आहेत. फिर्यादी महिला कुटुंबासोबत घरी झोपलेल्या असताना त्यांना घराची कौले वाजल्याचा दोन ते तीन वेळा आवाज आला.
त्यामुळे त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिल्या असता मफिद बोरकर हा त्यांच्या घराची कौले काढून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर घराबाहेर उभा असलेल्या अल साहिल काळसेकर याच्या धावपळीचा आवाज त्यांना ऐकू आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 28/Apr/2025













