Konkan Railway: वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसचे पावसाळी आरक्षण खुले

खेड : Konkan Railway : कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाल्याने प्रवाशांचा गोंधळ दूर झाला आहे.

कोकण मार्गावर १० जून ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी होते.

रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी खुले होते. मात्र, गाड्यांचे पावसाळी वेळापत्रकच जाहीर न झाल्याने सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह तेजस व एलटीटी-एक्स्प्रेसची पावसाळ्यातील आरक्षित तिकिटेच मिळत नव्हती मात्र आयआरसीटीच्या संकेतस्थळा वर १० जूननंतरच्या दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 28-04-2025