रत्नागिरी : टीएसई परीक्षेत परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील २१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शोध परीक्षेत (टीएसई) गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. यामध्ये आभा भावे, ओवी जाधव, अवनी ढाणे, मल्हार वैद्य, ओम बाणे या पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.

नीरजा आगाशे, कनिका भुवड, श्रीशा पाटील, आरोही कदम, अवनी पेटकर, विहान कांबळे, गार्गी आंब्रे, काव्या नांदगावकर, दुर्वांक प्रभुकेळुसकर, श्रीयांश पवार, श्रीशांत दिवाडकर, वरद गावखडकर, मानस सुर्वे, रुद्र सरदेसाई, आरोही ढाणे, अर्नेश कदम या १६ विद्यार्थ्यांनी केंद्र गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर व सहकारी शिक्षक यांच्या हस्ते पुस्तके भेट देऊन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक संपदा सावंत, शिवानी मोहिते, महेश साळुंके, ज्योती शेंडगे, नेहा भातडे, प्रियंका मुरुडकर यांनी मोफत जादा शिकवणी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकाश कदम, कांचन शिंदे, गीताली शिवलकर, उदय आरेकर, प्रणोती सिनकर, स्मिताली परब या शिक्षकांनी वर्ग स्तरावर मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 29-04-2025