इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीला मंजुरी दिली आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणांतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना काही रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

“राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी केलेली आहे. त्यामध्ये प्रवासी इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना विशिष्ट रस्त्यांवर टोलमाफी देण्यात आली आहे.इलेक्ट्रिक व्हेईकलची निर्मिती आणि वापर वाढला पाहिजे आणि त्यासह चार्जिगची व्यवस्था तयार झाली पाहिजे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी मंत्रिमंडळाने मान्य केली आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यासोबत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनाही सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सहा मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 29-04-2025