रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीक रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी : रेल्वे स्टेशन ते रेल्वे फाटा असा जाणाऱ्या वृद्ध पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी पादचाऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश केरू मोहिते (रा. शिळ, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वा. घडली. फिर्यादी यांचे चुलत सासरे चंद्रकांत राजाराम सुर्वे (६६ मूळ रा. तुळसणी, ता. संगमेश्वर, मूळ रा. एल. बी. एस मार्ग मंगत्राम पेट्रोलपंप भांडूप वेस्ट मुंबई) हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे चालत जात असताना रिक्षा (एमएच-०८-एक्यू -०७७४) वरील चालक राजेश मोहिते याने चंद्रकांत सुर्वे यांना धडक दिली.

या अपघातात सुर्वे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 30/Apr/2025