संगमेश्वर : भगवानगडावरील मातीचे होणार पूजन

संगमेश्वर : महाराष्ट्र महोत्सवाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेत महामानवांचे, महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या, महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगलकलश मुंबईत एकत्र आणले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत्या १ मेपर्यंत हे सर्व मंगलकलश मुंबईत आणले जातील.

त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजवाडी येथील भगवानगड येथील गावातील मातीचे पूजन करून, ती माती कलशामध्ये घेण्यात आली. हा कलश मुंबईत रवाना करण्यात येत आहे. याप्रसंगी राजेंद्र सुर्वे, कडवईचे दत्ताराम ओकटे, सहदेव सुवरे, संतोष भडवळकर, प्रदीप शिर्के, राजवाडी विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप म्हादे, मयूर भिंगार्डे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 30/Apr/2025