Gold Rate Today: आज अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात रेलचेल सुरु आहे. सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह असून सोन्याच्या दराबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे.
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहचले आहेत.
सोन्याचा भाव प्रति तोळा आज पुन्हा एका लाखांच्या पार गेला आहे.
अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर मुंबईत सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1 लाख 631 रुपयांवर पोहोचला आहे.
कालच्या भावाच्या तुलनेत सरासरी दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे.
2025 मध्ये सोन्याचे दर 26 टक्क्यांनी वाढले आहेत. कारण अमेरिका विविध देशांवर टॅरिफ लादला आहे. सध्या ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळं सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यपारी संबंध सुधारल्यांनतर त्यामध्ये स्थिरता आल्यानंतर सोन्याची मागणी कमी होऊ शकते. यामुळं गुंतवणूकदारांनी जास्त दरानं सोने खरेदी करण्यापूर्वी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.
दरम्यान, भारतात अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 30-04-2025














