रत्नागिरी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून वनस्पतीशास्त्र विषयामध्ये डॉक्टरेट मिळविली आहे. ‘टॅक्सोनॉमिकल स्टडीज् इन फॉलिकोलस ब्लैक मिल्ड्र फंगी फ्रॉम रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टस’ हा संशोधनाचा विषय होता. त्यासाठी डॉ. अंजली पाटील, डॉ. चंद्रहास पाटील यांच्या मार्गदर्शनासह कुटुंबीयांची साथ मोलाची ठरल्याचे डॉ. नाटेकर यांनी सांगितले.

नाटेकर यानी दोन्ही जिल्ह्यांमधून विविध वनस्पतींवरुन सुमारे दीडशेपेक्षा जास्त काळ्या बुरशीचे नमुने गोळा केले आहेत. यातील अभ्यासात भारतामधून पहिल्यांदा नव्या पाच प्रजातींची नोंद झाली आहे. तर, ६७प्रजातींची पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी नोंद झाली आहे. जागतिकस्तरीय आठ नवीन काळ्या बुरशीच्या प्रजातीचा संशोधनातून शोध लावला आहे. या संशोधनासह सात शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले असून, त्यांनी बारा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन आपले संशोधन सादर केलेले आहे.
नोंद झालेल्या नव्या प्रजाती
भारतामधून पहिल्यांदाच नोंद झालेल्या नव्या प्रकती अपेंडीकुलेला ग्लोरिओसा, अस्टेरिडियला कॉम्ब्रेटी व्हरायटी लिओनेन्सिस, अस्टेरिडियला लिकोला, मेलिओला होलारिनिकोला, मेलिओला हिंड्नोकार्थी.
संशोधित त्या प्रजाती: अस्टेरिना डायसोझायली, अस्टेरिना मेलोटी, अस्टेरोस्टोमेला रायटी, अस्टेरोस्टोमेला सलासी, अस्टेरोस्टोमुला कॉक्सिनी, इरिणोप्सिस अनाकार्डी, मेलिओला हेटेरोफ्राग्मी, मेलिओला राऊरीकोला
जंगलातील निरूपद्रवी बुरशी
ब्लॅक मिल्डूज (काळी बुरशी) म्हणजे मुख्यतः जंगली अधिवासात येणारी निरूपद्रवी बुरशी. साधारणपणे ज्या ठिकाणी हवेमध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते त्या ठिकाणच्या वनस्पतींच्या पानावर, देठावर खोडावर ठळकपणे काळे स्पॉट तयार करून फक्त जगण्यासाठी वनस्पतीमधील अन्न शोषून घेणारी बुरशी. आतापर्यंत कुठल्याच कृषी पिकावरती तिचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन नुकसान झाल्याची नोंद नाही. (अपवाद फक्त सिट्रस मॅक्सिमा यावरती मेलिओला सिट्री-मॅक्सिमी ही प्रजाती थायलंड येथून नोंद केलेली आहे.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 30/Apr/2025














