दापोली : रहदारीच्या ठिकाणी वाहने उभी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दापोली : दापोली बसस्थानकासमोरील रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी वाहने उभी केल्याने दोघांवर दापोली पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

या कारवाईत प्रदीप दत्तात्रय राजपूत (५४, रा. झरीआळी, दापोली) आणि मुकुल मनोज नेने (३२, रा. पोस्ट लेन, दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याविरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साखरकर यांनी फिर्याद दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 30/Apr/2025