चिपळूण परिसराला पावसाने झोडपले

चिपळूण : परिसरात परतीच्या पावसाने मंगळवारी रात्री अक्षरश: झोडपून काढले. विजांचा व ढगांचा गडगडाट आणि वादळी पाऊस यामुळे चिपळूण तालुक्यासह ग्रामीण भागात वीज पुरवठाही खंडित झाला. अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस पडतच होता. त्या पावसामुळे कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे.

गेले काही दिवस परतीचा पाऊस सातत्याने पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी होत आहेत. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. अनेक ठिकाणी तो पहाटेपर्यंत सुरूच होता. चिपळूण शहर परिसरात मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत जोरदार पाऊस झाला. पहाटेपर्यंत पावसाची रिप रीप सुरूच होती. या पावसामुळे हळव्या भात शेतीचे नुकसान झाले असून फुलात आलेल्या महान भात शेतीलाही त्याचा फटका बसणार आहे. रात्रीच्या वेळी अचानक पाऊस झाल्याने वाळत घातलेली भात रोपे पावसात भिजली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 10-10-2024