खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लवेल (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुचाकी तसेच ट्रकचा अपघात होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खेड पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खेडमधील पिरलोटे विठ्ठलवाडी येथील अंकुश गणपत चाळके (वय ६७) व त्यांची पत्नी अर्चना अंकुश चाळके (वय ६०) हे त्यांच्या मालकीच्या टीव्हीएस ज्युपिटर (क्र. एमएच ०८ एडब्ल्यू ५७९६) गाडीवरून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गान खेडच्या दिशेने जात होते.
दरम्यान, समोरून राँग साईडने भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहतूक ट्रक (क्र. एमएच १५ एचएच ७५८७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अंकुश चाळके यांच्या डोक्याला, छातीला, डाव्या पायाला, जिभेला व जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या पत्नी अर्चना चाळके यांच्या डाव्या हाताला फ्रेंक्चर होऊन त्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी राजन श्रीराम चाळके (वय ४५, व्यवसाय किराणा दुकानदार, रा. पिरलोटे विठ्ठलवाडी) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ट्रक चालक सागर विठ्ठल पठाडे (वय २९, रा. सोमठाजोष, ता. येवला, जि. नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाता संदर्भात पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 01/May/2025














