Ratnagiri News : एसटी बसमध्ये शाळकरी मुलीचा वाहकाकडून वियनभंग; विद्यार्थीनींनी चोपून काढले

रत्नागिरी : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता शाळकरी मुलीचा एसटी बसमध्ये वाहकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच विद्यार्थीनींनी वाहकाला चोपून काढले.

एकीकडे नवरात्री (Navratri) उत्सव साजरा होत असताना, महिलांनीच आज दुर्गा, कालिका बनून स्वत:चं रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यातच, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील काही मुलींच्या धाडसी कृत्यातून हा धडा समाजाला मिळालाय. तसेच, एक आदर्शही त्यांनी इतर मुलींपुढे उभा केलाय, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

रत्नागिरी जिल्ह्याील दापोली येथे कॉलेजच्या विद्यार्थींनी आदर्शवत काम केलं असून त्यांच्या या धाडसाचं कौतूक होत आहे. एका मुलीची छेड काढणाऱ्या कंडक्टरला तिच्या मैत्रिणींनी चांगलंच धुतलंय. दापोली-पंचंनदी बसमध्ये चढलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे. या विद्यार्थींपैकी एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगलंच सुनावल आणि धोपटलंही आहे. मुलींचा हा रौद्रअवतार पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली होती, बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे दाभोळमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मर्दानी बनून मुलीने कंडक्टरला चांगलाच धडा शिकवलाय. तसेच, याप्रकरणी कंडक्टरची दाभोळ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 10-10-2024