मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले.
राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 01-05-2025














