रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरातील दुकानातून रोख १० हजार रुपये लांबवणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
चोरीची ही घटना सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१८ ते रात्री ८ वा. कालावधीत घडली होती. विठ्ठल संजय घोडके असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात दुकान मालक पंकज रमेश सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंकज सुर्वे यांचे मारुती मंदिर मजगाव रोड येथील अन्नपूर्णा संकुलामध्ये यश ऑप्टिकल्स नावाचे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते रात्रीच्या कालावधीत संशयित विठ्ठल घोडकेने या दुकानातील रोख १० हजार रुपये लांबवल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 10/Oct/2024














