गुहागर : पाणीपुरी सेंटरमधील रगड्यामध्ये किडे

गुहागर : तालुक्यातील एका पाणीपुरी सेंटरवरून पालपेणे येथील नामदेव पडवेकर आपल्या नातवांसाठी पाणीपुरीसाठी लागणारा रगडा घेऊन गेले होते.

घरी गेल्यानंतर आपल्या नातीला तो रगडा गरम करायला सांगितलं. तिने तो गरम करायला सुरुवात केल्याने आतून किडे, काळ्या रंगाच्या अळ्या वर येऊ लागल्या. तिने ही गोष्ट आजोबांच्या लक्षात आणून दिली. पडवेकर यांनी मित्राला याची माहिती देऊन चौकशी करायला सांगितले.

मित्रांनी संबधित पाणीपुरी सेंटरवर जाऊन याबाबत मालकाकडे याची चौकशी केली व तिथे असणाऱ्या रगड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर आतून किडे बाहेर आले.

हे सर्व बघितल्यानंतर मालकाने माझ्याकडून चूक झाली, असे सांगितल्याचे पडवेकर यांनी सांगितले. हे चुकीचे झाले असून, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारवाई व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 01/May/2025