रत्नागिरी : मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषिपंप बसवण्यात येत आहेत.
प्रतीक्षायादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत आहेत. याबाबतची तक्रारही प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली आहे. त्यानुसार पंप बसवण्यात येत आहेत. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत.
शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसवण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नाही. शेतकऱ्याने रक्कम भरून पंप बसवणाऱ्या एजन्सीची निवड केली की, नाव प्रतीक्षायादीत समाविष्ट होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 02/May/2025














