राजापूर : राजापूर रोड रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे लोकार्पण सोहळाचे उद्घाटन सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांच्या हस्ते करण्यात आले.
बुधवारी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पाच रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळेस राजापूर रेल्वेस्टेशन सुशोभीकरण लोकार्पण सोहळाप्रसंगी किरण सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळीच रेल्वे स्टेशनला यथील रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी किरण सामंत यांनी रिक्षा चालकांना शुभेच्छा देत रिक्षाचालकांच्या कोणत्याही प्रसंगी मी पाठीशी उभा राहणार असून, सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. जास्मिन, तहसीलदार विकास गबरे, पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर सुतार, सुरेश गुरव, ओबीसी सेल प्रमुख अनिल करगुंटकर, सुयोगा जठार, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियता प्रमोद कांबळे, अभियंते ज्ञानेश्वर चिंचाळे, प्रभावती रानडे, विशाल रानडे, शुभांगी डबरे, प्रफुल्ल सुर्वे, अनमोल सिनकर, रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष नितीन शिंदे, अनिल गुरव, शीतल पटेल, कृष्णा पोटले-पाटील, संजय जोगले, गावकर रमेश सौदळकर, शशिकांत प्रभुदेसाई, भरत लाड यांच्यासह भाजपा व सेनेचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, सर्व रिक्षा व्यावसायिक व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल गोठणकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 10/Oct/2024