लांजा : पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर समारंभ पूर्वक पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बहुमान आहे. यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे तसेच सतत नवीन शिकण्याची जिद्द ठेवावी, असे प्रतिपादन श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील चव्हाण यांनी लांजा येथे पदवी प्रदान सोहळ्यात केले.
लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात नुकताच पदवी प्रदान समारंभ झाला. यावेळी डॉ. सुनील चव्हाण बोलत होते. याप्रसंगी राजापूर येथील आबासाहेब मराठे कला आणि न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या पदवी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम वंजारे, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. काशिनाथ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. डॉ. राहुल मराठे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विक्रांत बेर्डे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 01/May/2025














