Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! ‘या’ 10 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

मुंबई : Maharashtra Weather Update | राज्यात तापमानाचा पारा असह्य झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज प्रचंड उष्ण व दमट हवामान आहे . हवामान विभागाने 10 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिलाय.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे,सातारा, सोलापूर तसेच अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा हाय अलर्ट देण्यात आलाय. ( Maharashtra Weather Update )

अकोल्यात आज 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे .एक दोन जिल्हे वगळता विदर्भात तापमान 41 – 45 च्या पुढे आहे.

विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. ( Maharashtra Weather Update )

पुण्यात आज 39.7°c तापमान आहे .सातारा 40.7,सोलापूर 43.6,नंदुरबार 43.4,जळगाव 43.5 अंशावर गेलं आहे.

छत्रपती संभाजी नगर मध्ये 42.4 अंश सेल्सिअस परभणीत 43.7,नांदेड 42.4 लातूर 41.2 धाराशिव 42 अंशावर आहे.

पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातही पाऊस कायम राहणार आहे. ( Maharashtra Weather Update )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:12 01-05-2025