रत्नागिरी : कोकण रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण झाल्याने, त्याच्या माध्यमातून पर्यटनाच्या अधिक संधी निर्माण होतील, रोजगारासाठी कोकणातून लोकांचे होणारे स्थलांतर यानिमित्ताने थांबले पाहिजे, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकासकाम कसे पोहोचेल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
राज्याच्या विकासाचा व्हीजन होत असून, आराखडा टाटाच्या माध्यमातून तयार होत असून, विकासाचे राजकारण अविरत सुरु ठेवायचे असेल तर महायुतीला आशिर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमानिमित्ताने केले.
कोकण रेल्वे मार्गावरील कोकणातील १५ रेल्वेस्थानकांचा सुशोभिकरण सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आला, यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी व राजापूर या जिल्हयातील पाच रेल्वे स्थानकांचा समावेश होता. रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचे लोकार्पण बांधकाम मंत्र्यांच्याहस्ते प्रत्यक्ष तर चार स्थानकांचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र बापट, अधीक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे व दादा दळी, भाजपाच्या उल्का विश्वासराव, शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले की, कोकणवासियांचे एक वेगळे नाते कोकण रेल्वेशी आहे. रेल्वेने प्रवास करताना एक वेगळे आकर्षण आहे. याचदृष्टीने शेवटच्या माणसापर्यंत काम कसे जाईल, याचसाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करीत आहे. विमानतळाप्रमाणे रेल्वेस्थानकाचे रुपडे बदलण्याचा निर्णय घेतला व ती कामे आता टप्प्याटप्प्याने पूर्णही होत असल्याने त्यी सांगितले.
ते म्हणाले, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वेचे प्रणेते प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जागवण्याचे काम केले आहे. कोकणातील एखादा व्यक्ती मोठा होतो, त्यावेळी आपल्य कोकणच्या विकासासाठी कशी मेहनत घेतो, याचे उदाहरण म्हणजे रविंद्र चव्हाण आहेत. बांधकाम विभागाच्य माध्यमातून त्यांनी कोकण रेल्वे स्थानकांचा कायापालट केला आहे.
रेल्वेस्थानकावरील अन्य सुविधांसाठी आपण एमआयडीसीच्य माध्यमातून ३८ कोटी रुपये दिले आहेत त्या कामाचा शुभारंभही मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुरत्न योजनेमधून रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील ११ हजार पाचशे रिक्षा व्यावसायिकांच्या विमा हप्त्यातील दोन हजार रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले. माजी आमदार बाळ माने यांनी आंबा बागायतदारांच प्रश्न मांडला होता. त्यानुसार आंब वाहतुकीसाठी पिकअप गाडीला साडेतीन लाख सिंधुरत्नमधून देणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्यावर काहींनी टिका केली. मात्र महायुतीच्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची पाठराखण केली पाहिजे. त्यांचे सर्वपक्षियांशी व पदाधिकाऱ्यांशी ‘कॉर्डिनेशन’ चांगले असते. अगदी कोकण रेल्वेच्या य कार्यक्रमासाठीही त्यांनी सर्वांशी संपर्क साधत जबाबदारी पार पाडल्याचे कौतुकही मंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरीत प्रत्यक्ष तर इतर स्थानकांत ऑनलाईन कार्यक्रम
रत्नागिरी येथे प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा बांधकाम मंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्ह्यातील उर्वरित स्थानकांमध्ये ऑनलाईन पध्दतीने उपक्रम पार झाला. खेड स्थानकावर आ. योगेश कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, चिपळूण येथे आ. शेखर निकम, माजी आम. सदानंद चव्हाण, संगमेश्वर येथे माजी आमदार डॉ. विनय नातू, राजापूर येथे सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत, अजित यशवंतराव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 10/Oct/2024














