खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन बोगद्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी पर्यायी असलेल्या घाटातील जुन्या महामार्गावरील वाट खडतर बनली आहे. या मार्गावर पडलेल्या मेगांमुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. बोगद्यातही दरडीचा अडसर उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ‘राम भरोसे राहिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत डोंगराची कटाई करून नवीन महामार्ग भुयारी मार्ग वळवण्यात आला आहे. भोगाव हद्दीत घाट रस्त्याला ५ ते १० मीटर अंतरापर्यंत मेगा पडल्या आहेत. यामुळे जुन्या महामार्गाची वाट बिकट बनली असून पावसाळ्यात धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर मार्ग खचल्यास बोगद्याकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरडी कोसळण्याचा दाट संभव आहे. घाट रस्त्यावर मेगा पडल्याने मुस्खलन होवून नवीन महामार्गावर दरडी कोसळून वाहतूक ठप्प होऊ शकते. असे झाल्यास जुन्या महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जाणार आहे.
मात्र जुना घाट रस्ता खचल्याने धोकादायक मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीव मुठीत घरुनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. नव्या बोगद्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याने अजूनही उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 01/May/2025













