चिपळूण ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश पिंगळे यांची एकमताने निवड

चिपळूण : चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश पिंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसेवक संघटनेची बैठक झाली. यावेळी संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा झाली. माजी अध्यक्ष संदीप कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्ष निवडीवर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संघटनेतील अभ्यासू असलेल्या कोळकेवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पिंगळे यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. त्यानंतर सचिवपदी रोहिदास हांगे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी राहुल कोरडे, महिला उपाध्यक्षा जान्हवी साळवी, सहसचिव सुप्रिया मालगुणकर, कायदेशीर सल्लागारपदी संदीप कदम, सदस्यपदी श्रीधर भागवत, मनोहर गायकवाड, दिनेश पारधी, संगीता गावडे, विश्वास पवार यांची निवड झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 10/Oct/2024