लांजा : देशात स्वच्छता पंधरवडा सुरू असतानाच या उपक्रमांतर्गत लांजा नगरपंचायतीनेही स्वच्छता पंधरवडा साजरा करत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले.
केंद्रीय गृहनिर्माण, शहरी कार्यालय मंत्रालय भारत सरकार यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने लांजा नगर पंचायतीच्यावतीने सफाई मित्र सुरक्षा शिबीर, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, स्वच्छता रॅली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आणि स्वच्छता प्रतिज्ञा असे विविध उपक्रम यशस्वीपणे पार पडले. लांजा नगर पंचायतीच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता भारत दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सफाई कर्मचारी व स्वच्छतेसाठी योगदान दिलेल्या सर्व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 10/Oct/2024














