रत्नागिरी : महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. कोकण परिमंडळात या योजनेचा पहिला ड्रॉ जाहीर झाला असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ ग्राहक विजेते ठरले.
या योजनेअंतर्गत दि. १ जानेवारी ते दि. ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा अधिक वीजबिले ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या सर्व लघुदाब ग्राहकांना सहभागी होता येते. प्रत्येक उपविभागासाठी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अधीक्षक अभियंता वैभव पाथोडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही वीज ग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्ट वॉचचे वाटप करण्यात आले. इतर विजेत्यांना उपविभागीय कार्यालयातून बक्षीस देण्यात आले.
मे व जून महिन्यात आणखी दोन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. विजेते mahdiscom.in या संकेतस्थळावर जाहीर केले जातील. नोंदणीकृत मोबाइलवर सूचना दिली जाणार आहे. या योजनेसाठी वीजबिलाची थकबाकी दहा रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 03/May/2025














