रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ४ मे रोजी रत्नागिरीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच पक्षाचा मेळावा होत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
जितेंद्र आव्हाड शनिवारी रात्री रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत. रविवार ४ मे रोजी सकाळी ११ वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कार्यकर्त्यांसह या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 03/May/2025














