चिपळूण : गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या रंगमंचाचे उद्घाटन आ. शेखर निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी गोवळकोट गावाच्या विकासासाठी आपण खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन आ. निकम यांनी दिले. आ. शेखर निकम यांच्या आमदार फंडातून संरक्षक कठडा व रंगमंचाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन आ. निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी करंजेश्वरी देवस्थानच्या विकासाचा आराखडा तयार करून तो मंजूर करूया आणि गावच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर, विश्वस्त वसंत भैरवकर, राजू विखारे, महेश सागावकर, अजित पावसकर, सुभाष बुरटे, डॉ. शंकर जड्याळ, संतोष टाकळे, रवींद्र हरवडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 10/Oct/2024














