Maharashtra Board HSC Results 2025: राज्यातील बारावीचा निकाल आज, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 मेपासून त्यांच्या महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. आता परीक्षेच्या निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्याचा बारावीचा निकाल आज 5 मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.
खालील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल
1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in
मंडळाच्या वेबसाईटशिवाय निकाल कुठं पाहावा?
3. https://hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
5. https://results.targetpublications.org
निकाल कसा पाहायचा?
– सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
– होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
– तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
– तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
दरम्यान, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
आईचे पहिले नाव आवश्यक असेल.
4) विद्यार्थ्यांना गुण कळणार की फक्त पास-नापास समजणार?
विद्यार्थ्यांना निकालात संपूर्ण विषयाचे गुण दिसणार आहे. त्यामुळे ऑनलाईन निकाल पाहताना कोणत्या विषयात किती गुण मिळाले, याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
5) निकाल पाहताना अडचणी आल्या तर काय कराल?
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल बघात असताना बहुतांश वेळी वेबसाईट ट्राफिकमुळे धीम्यागतीने चालत असते. अशावेळी आपल्या मोबाईलवरून MHSCC असे टाईप कारा आणि 5776 या क्रमांकावर SMS करा. जेणेकरून तुम्हाला SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 05-05-2025














