रत्नागिरी : भरधाव कार बाजूने गेल्याने घाबरुन रस्त्यावर पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथे भरधाव कार बाजूने गेल्याने घाबरुन रस्त्यावर पडलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

सुजाता अनंत शेलार (५५, रा. बसणी मधली तेलीवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढ महिलेचे नाव आहे. त्या २५ एप्रिल रोजी सकाळी ११.४५ वा. सुमारास बसणी येथील रस्त्याच्या शेजारुन जात असताना एक भरधाव कार त्यांच्या बाजूने गेली.

त्यामुळे सुजाता शेलार या घाबरल्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या उंचसखल रस्त्यावर पडून जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवार ३ मे रोजी दुपारी २.४० वा. सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 05/May/2025