देवरूख : मोबाईल चोरट्याला सहा महिने कारावास

देवरूख : दादर रेल्वे स्टेशन येथून तुतारी एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या मोबाईल चोरास देवरूख न्यायालयाने ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतुल अशोक शिर्के (रा. गुहागर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भीमराज शिवराम कांबळे राहणार परेल व त्यांची पत्नी भावना कांबळे हे २४ जुलै २०२२ रोजी दादर रेल्वे स्टेशन येथे तुतारी गाडीने ठाणे ते संगमेश्वर दरम्यान प्रवास करत असताना भावना कांबळे याच्या पर्स मध्ये ठेवलेला मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी अतुल अशोक शिर्के (राहणार मुळगाव मौजे मढाळ, शिर्केवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पंदेरे तपास करत होते.

संगमेश्वर पोलिसांनी योग्यरीतीने तपास करून आरोपीला पकडले. यानुसार न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यात कोर्ट पैरवी म्हणून साक्षी सचिन कामेरकर यांनी काम पहिले. मोबाईल चोरी प्रकरणी आरोपी अतुल अशोक शिर्के याला देवरुख न्यायालयाने ६ महिन्याची कारावास शिक्षा सुनावली आहे. संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 05/May/2025