गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी शिंदेवाडी येथील नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन जमिन खोदून दोन फूट जमिनीत टाकण्या ऐवजी ती जमिनीच्या वर उघड्यावर ठेवण्यात आली आहे. ही पाईपलाईन योग्य त्या प्रमाणात जमिनीत टाकण्यात यावी, अशी आग्रही मागणी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व सेवाभावी कार्यकर्ते दीपक शिंदे यांनी केली आहे.
कळझोंडी गावातील बौद्धवाडी, आग्रेवाडी, शिंदेवाडी, तिखवटवाडी, ब्राह्मणवाडी अशा विविध वाडयामधून पाणीपुरवठा पाईपलाईन गेली आहे. ठेकेदाराने ही पाईपलाईन दोन फूट जमिनीत जाणे आवश्यक आहे. परंतु येथील ठेकेदाराने काही भागातील पाईपलाईन योग्य प्रमाणात खोदाई करून पूर्ण केली आहेत. मात्र काही भागात या पाईपलाईन जमिनीवरील भागाच्या वरच्या वर टाकण्यात आलेल्या आहेत. येथील बऱ्याच पाईप लाईन जमिनीच्या वरच्या वर दिसत आहेत. याबाबत यापूर्वी गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांना दाखवलेल्या आहेत.
परंतु अजूनही शिंदेवाडी येथील वाडीतील पाईप लाईन जमिनीच्या वर दिसत आहेत. तरी पाईपलाईन ही नियमावलीनुसार योग्य त्या प्रमाणात जमिनीत टाकण्यात यावी, अशी आग्रही मागणी येथील नागरीक दीपक शिंदे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 05/May/2025














