पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप

राजापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी राजापुरात भाजपाच्या वतीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मंगळवारी देशात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजापूरातही भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला व पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंगळवारी सकाळी राजापूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला आघाडीच्या सौ. सुयोगा जठार, दीपक बेंद्रे, विनायक कदम, वेळी राजापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर शर्मा आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 18-09-2024