Maharashtra Board 12th Result 2025 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र बोर्डाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. या निकालात त्यांनी विभागनिहाय आकडेवारी, तसेच बारावीच्या कोणत्या विभागाचा निकाल काय याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे.
बारावीचा निकाल ९१.८८ टक्के
महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. यातील १४ लाख १७ हजार ९६९ हे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाला असून विभागनिहाय आकडेवारी कोकण विभाग अव्वल आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका आहे.
बारावी बोर्ड २०२५ चा विभागनिहाय निकाल
- कोकण -९६.७४
- कोल्हापूर – ९३.६४
- मुंबई – ९२.९३
- संभाजीनगर – ९२.२४
- अमरावती – ९१.४३
- पुणे -९१.३२
- नाशिक -९१.३१
- नागपूर – ९०.५२
- लातूर – ८९.४६
बारावी शाखानिहाय निकाल महाराष्ट्र बोर्ड
शाखा – विद्यार्थी – उत्तीर्ण – टक्केवारी
विज्ञान – ७,३५,००३ – ७,१५,५९५ – ९७.३५
कला – ३,४९,६९६ – २,८१,६०६ – ८०.५२
वाणिज्य – २,९९,५२७ – २,७७,६२९ – ९२.६८
व्यवसाय अभ्यासक्रम – २९,३६३ – २४,४५० – ८३.२६
आयटीआय – ४३८० – ३५९३ – ८२.०३
एकूण – १४,१७,९६९ – १३,०२,८७३ – ९१.८८
७५ टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती?
बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ इतकी आहे. यात फर्स्ट क्लास आणि त्याच्या पुढे संख्या ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ इतके आहेत. तर ३५ टक्के ते ४४.९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ इतकी आहे. असे एकूण १४ लाख ६४ हजार ६०१ पैकी एकूण १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
१०० टक्के गुण कुणालाच मिळाले नाहीत.
१९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहेत.
४५६२ कॉलेजचा निकाल ९० ते ९९.९९
३८ कॉलेजचा निकाल ० टक्के लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक –
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४.%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ( ८९.४६ %) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे.
८. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी
यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. यंदा निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी झाली आहे.
निकालातील महत्त्वाचे मुद्दे –
१. कॉपी प्रकरणामुळे बारावी परीक्षेत १२४ केंद्रांची परवानगी काढून घेण्यात आली आहे.
२. यंदा परीक्षेतील गैरमार्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आला आहे.
३. योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची उत्तम सोय केली होती.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये-
१. ९ विभागीय मंडळातून एकूण १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ९१.८८ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
२. पुनर्परीक्षेचा निकाल- ३७.६५ टक्के आहे
३. दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
कोकणची राज्यात बाजी- ९६.९४ टक्के आहे (सर्वोत्तम), लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
९४.५८- मुलींचा निकाल
८९.५१- मुलांचा निकाल
१४७ विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी, विविध कारणांनी १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर येथील १३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या खालाेखाल पुणे ६, लातूर २, काेल्हापूर १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 05-05-2025














