राजापूर रेल्वेस्थानकात सोल्ये गावच्या उल्लेखाची मागणी

पाचल : कोकण रेल्वेची उभारणी करताना सोल्ये गावाला रेल्वे स्थानक मिळाले. मात्र या रेल्वे स्थानकाला राजापूर रोड रेल्वे स्थानक स्टेशन असे नाव देण्यात आले. मात्र, या सोल्ये गावात रेल्वे स्थानक आहे. त्या गावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सोल्ये गाव तसेच परिसरांमध्ये प्रचंड नाराजी तथा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या नावात सोल्ये गावाचा उल्लेख करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केळवली गावचे ज्येष्ठ समाज सेवक राजाभाऊ केळवलकर यांनी केली आहे. याबाबत रेल्वेमंत्री व खासदार नारायण राणे यांना लेखी निवेदन देऊन यावर कार्यवाही करण्याची मागणी केळवलकर यांनी केली आहे.

कोकण रेल्वेसाठी सोल्ये गावातील शेतकऱ्यांनी रेल्वेच्या माध्यमातून बारमाही ये-जा व दळणवळण करण्याकरीता व विकासासाठी आपल्या जमिनी कोकण रेल्वेला दिल्या. जेणेकरून आपल्या गावाचे नाव रेल्वे स्थानकाला दिले जाईल. परंतू आजमितीपर्यंत राजापूर रोड रेल्वे स्थानक सोल्ये असा गावाच्या नावाचा उल्लेख नाही, याचे आश्चर्य वाटते. सोल्ये गाव मध्यवर्ती असे ठिकाण आहे. कोकण रेल्वेच्या उत्पादनात यामुळे चांगली भर पडते. कोकणातील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा विचार पुढे येत आहे. रेल्वे स्थानकांची नावे त्या-त्या गावाच्या नावाने ठिकठिकाणी दिली गेली आहेत. तरी सोल्वे गावाचे नाव राजापूर रोड रेल्वे स्थानकाला सोल्ये गावाच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा. या बाबत संबंधित अधिकारी, रेल्वेमंत्री लोकप्रतिनिधी यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केळवलकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 05/May/2025