अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.५३ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल ९८.५३ टक्के लागला. यात कला शाखा ९६.९९ टक्के, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी विभाग १०० टक्के आणि विज्ञान शाखा ९८.२७ टक्के निकाल लागला.

कला शाखेत प्रथम क्रमांक स्वरा अरुण मुळये (९५.८३), द्वितीय क्रमांक अदिती मिलिंद जोशी (९५.५०) तृतीय क्रमांक स्वरा शैलेश पाटणकर (९३.३३) हिने मिळवला. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मधुरा दिगंबर करमरकर (९७.५०), द्वितीय क्रमांक आदित्य मनिष पानगले (९७.००), तृतीय क्रमांक शर्वाणी समीर दामले (९६.००) हिने मिळवला.

विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक धनश्री निलेश वैशंपायन (९२.६७), द्वितीय क्रमांक अंकुर अमित घारपुरे (८९.८३), पार्थ प्रफुल्ल बोरकर (८९.८३) आणि तृतीय क्रमांक सारंग मंदार जोशी (८८.००) याने मिळवला.

एम.सी.व्ही.सी विभागात प्रथम क्रमांक रफा खालीद दवे (९२.६७), द्वितीय क्रमांक मारिया राहील भाटकर (९०.६७), तृतीय क्रमांक सेजल अजय आजगेकर (९०.००) यांनी मिळवला.

मानसशास्त्र विषयात ३ विद्यार्थ्यांना, संस्कृत विषयात १४ विद्यार्थ्यांना, आयटी व इलेक्टॉनिक्स या विषयात प्रत्येकी एका विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले आहेत. वाणिज्य शाखेत ९० टक्केपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनिल गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर व सर्व विभागप्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:23 AM 06/May/2025