रत्नागिरी, 06 मे 2025 : रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर गांधीधाम हमसफर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा 27,999 रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरत (गुजरात) येथील रहिवासी रिझवाना बान अल्ताफ (वय 42) या फिर्यादी 11 एप्रिल 2025 रोजी गांधीधाम हमसफर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20923, कोच एस-2, सिट क्रमांक 34) मधून पनवेल ते सुरत असा प्रवास करत होत्या. रात्री 8:30 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली असता, त्यांनी सिटवर ठेवलेला iQOO Neo 6 5G (Dark Nova रंग, किंमत 27,999 रुपये) हा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. फिर्यादी झोपेत असताना ही चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गुन्हा दाखल : फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रेल्वे पोलिसांनी 5 मे 2025 रोजी रात्री 10:25 वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी अशा घटनांची तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 06/May/2025














