चिपळूण : चिपळूण तालुक्यातील बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. तालुक्यातून डीबीजे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेतील विद्यार्थी तनीष शिरगावकर याने ९५.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक वाणिज्य शाखेची भूमिका शर्मा हिने ९५.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
शहरातील डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.०४ टक्के लागला आहे. महाविद्यालयातील तनिष शिरगावकर याने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९६.४४ टक्के लागला असून ३३८ पैकी ३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला असून ३२४ पैकी ३१५ विद्यार्थी उत्तीर्ण तर कला शाखेचा निकाल ७५.७८ टक्के लागला असून १३३ पैकी १०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून बारावी परीक्षेसाठी ८०७विद्यार्थी बसले होते. पैकी ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून अनुक्रमे तनीष शिरगावकर (९५.३३%), साक्षी बापट (८७.६७), शगुफ्ता गोलंदाज (८४.६७), शारदा दांडेकर (८३.५०), हर्षदा पालकर (८१%), वाणिज्य शाखेतून अनुक्रमे भूमिका शर्मा (९५.१७%), झोएब दळवी (९२.५०), नेहा कदम (९२), कला शाखेतून अनुक्रमे सई घाग (८४.३३), वनश्री गानु (८४.१७), गार्गी कदम (८३.८३) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर भिडे, चेअरमन मंगेश तांबे, उपाध्यक्ष डॉ. दीपक विखारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी, प्रबंधक अनिल कलकुटकी यांनी अभिनंदन केले आहे. सावर्डे कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५.४४ टक्के निकाल सावर्डे येथील गोविंदराव निकम कनिष्ठ महाविद्यालयातील तिनही शाखांचा मिळून एकूण निकाल ९५.४४ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून ४६१ विद्याध्यपिकी ४४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतून ३६६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी ३६० उत्तीर्ण झाले असून निकाल ९७.७४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून अनुक्रमे दीप्ती बुदर (७६%), हर्षवर्धन यादव (७५.५०%), यश मोरे (७४.५०). कला शाखेचा निकाल ७६ टक्के लागला आहे. या शाखेतून अनुक्रमे ऋतिका मोहिते (६८.३३%), प्रतिक्षा पवार (५८%), यश यादव (५७.६७%). वाणिज्य शाखेचा निकाल ९७.६५ टक्के लागला आहे. या शाखेतून अनुक्रमे नरेंद्र तावडे (८८.६७%), जान्हवी जाधव (७७, १७%), वैष्णवी बामणे व प्राची साळुंखे (७४.३३%) यांनी यश मिळविले. एमसीव्हीसीचा एकूण निकाल ९३.४२ टक्के लागला आहे. यामध्ये अनुक्रमे साक्षी गुरव (७९.५०% हॉर्टीकल्चर), कुणाल म्हसकर (७५.१७ टक्के बँकिंग) व अपूर्णा बोमाणी (७४.६७% एमएलटी), या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आ. शेखर निकम, सर्व संचालक, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 06/May/2025














