चिपळूण, 06 मे 2025 : चिपळूणातील गोवळकोट रोडवर पाळुची बाग येथे नदीकिनारी झाडाखाली गांजा सेवन करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 मे 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रोशन शंकर पवार (पोना/1533) यांना गस्ती दरम्यान माहिती मिळाली की, गोवळकोट रोडवरील पाळुची बाग परिसरात एक तरुण नदीकिनारी अंमली पदार्थाचे सेवन करत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. तिथे आरोपी राज राजेश लांजेकर (वय 21, मूळ रा. लांजा बाजारपेठ, रत्नागिरी, सध्या रा. पालवन सावर्डे, चिपळूण) हा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळला.
गुन्हा दाखल : फिर्यादी रोशन पवार यांच्या तक्रारीनुसार, 5 मे 2025 रोजी रात्री 10:06 वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 96/2025 अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 चे कलम 8(क) आणि 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी सध्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे राहत आहे. पोलिस त्याच्या अंमली पदार्थ सेवनाच्या सवयी आणि संभाव्य पुरवठा साखळीचा तपास करत आहेत. चिपळूण पोलिसांनी नागरिकांना अंमली पदार्थांच्या अवैध वापराबाबत सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद गतिविधींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस ठाणे करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 06/May/2025














