चिपळूण : देशातील संपविण्यासहीत दहशतवाद पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधून काढण्याकरिता भारताने पाकिस्तानमध्ये शिरण्याची भूमिका घेतल्यास आम्ही पंतप्रधान मोदींच्या पाठीशी राहू, अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी आज (दि. ५) पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मत व्यक्त करताना राऊत म्हणाले की, या हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. या बाबत पहलगामला गेलेल्या अनेक पर्यटकांनी हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना त्या ठिकाणी चार दिवस वावरताना पाहिल्याचे सांगितले जाते. त्यातूनच हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे.
पहलगामसारख्या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे माहित असूनही त्या ठिकाणी केंद्राकडून सुरक्षेविषयी पुरेशी दक्षता घेण्यात आली नाही. हल्लेखोर चार दिवस या ठिकाणी वावरत असताना सुरक्षा यंत्रणेला त्याची खबरही लागली नाही, हे दुर्दैव आहे. मात्र, आता हल्लेखोरांना शोधून दहशतवाद व अतिरेकी कारवाया संपविण्याकरिता भारताने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 06/May/2025














