तालुक्याचा एकुण निकाल ९७.१९ टक्के
राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राजापूर तालुक्याने आपल्या धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परिक्षेचा राजापूर तालुक्याचा एकुण निकाल ९७.१९ टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी १३२० विद्यार्थी बसले होते. पैकी १२८३ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, शिक्षकवृंदाचे अभिनंदन होत आहे. राजापूर तालुक्यातील कोंडये येथील इंद्रनील तावडे कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. एकूण ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कला विभागातून अजय वसंत उपळकर ५६. ५० टक्के प्रथम, संचिता नीलेश कांबळे द्वितीय ५२.८३आणि अस्मिता सुरेश शिवगण तृतीय ५२. ५० क्रमांकाने उत्तीर्ण झाले तर वाणिज्य विभागातून ऋतिक दत्तगुरू वाईत, प्रथम, ९२. ३३, श्रुती मंगेश बाईत, द्वितीय ७४. ६७, प्रियांका सत्यवान शिंदे तृतीय७३. ६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.त्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी, राजापूर संचलित नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल ९७. ३४ टक्के लागला. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर वाणिज्य शाखा९७. ०५ आणि कला शाखा ९१. ४२ टक्के लागला वाणिज्य शाखेमधून अनिकेत प्रकाश गुरव, प्रथम, ९२. ५० टक्के, अथर्व अनिल कानेरकर, द्वितीय ८७. ८३ टक्के, श्रावणी संदिप वेलणकर तृतीय ७८. ८३ टक्के विज्ञान शाखेतून पार्थ किशोर करंबेळकर, प्रथम, ७०. ५० अनघा परशुराम खंडे, द्वितीय ६६. ८३ आणि शाहीद अकिल मुजावर, तृतीय ६५. ५० टक्के, कला शाखेतून तन्वी रघुनाथ खानविलकर, प्रथम, ७६. ५० टक्के, रिया अनंत ठुकरुल, द्वितीय ७४. ५० टक्के, पूजा सुधाकर मांडवकर तृतीय ७१. ५० टक्के गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुलतान ठाकूर, उपाध्यक्ष श्री. निजाम काझी, सचिव मजीद पन्हळेकर, कोषाध्यक्ष म. हनीफ युसुफ काझी सह सचिव सलाम खतीब, तसेच प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, सर्व पदाधिकारी, सदस्य आदिनी अभिनंदन केले.
तालुक्यातील वाटुळ आदर्श विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज आर्टस् या विद्यालयाचा १२ वी रिझल्ट ८८.५७ लागला. या विद्यालयातून मुल्ला करिष्मा अमीन, प्रथम ७५.००टक्के, जाधव निखिल नीलेश, द्वितीय ६६.३३टक्के आणि, मांडवकर सुरज संजीवन तृतीय ६३.१७असे तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तालुक्यातील नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय ओणीचा निकाल ९७. ५४ टक्के लागला. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर विद्यान शाखा ९१. ३० टक्के आणि कला शाखा ९८. १८ टक्के निकाल लागला.
विज्ञान शाखेतून चौगुले सिध्दी विजय, प्रथम ५७.५०टक्के, पांचाळ आयुषी अनंत, द्वितीय ५३.५० टक्के नारकर सिध्दी दामोदर, ५३.तृतीय कला शाखेतून श्रद्धा संतोष मठकर, प्रथम ८८. ६१ टक्के, राखी राजेंद्र भेरे, द्वितीय ८२. १७ टक्के, साक्षी दत्तात्रय म्हादये, तृतीय ८०. ८३ वाणिज्य विभाग श्रद्धा नंदकुमार पांचाळ, प्रथम ८५.५०, शेखर महेश पांचाळ द्वितीय ८३. १७, सुयश विजय डोंगरे तृतीय ७८. ६७ टक्के गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 06/May/2025














