रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील जुवेवाडी याठिकाणी मोकळ्या जागेत मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ५ मे रोजी सायंकाळी ६. ३५ वा. करण्यात आली.
चंद्रशेखर ऊर्फ बाब्या मधुकर पाटील (वय ५८, रा. पावस जुवेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस फौजदार महेश मुरकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी संशयित हा त्याच्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 07/May/2025









