चिपळूण : राजकीयदृष्टीने शांतता असणाऱ्या उत्तर रत्नागिरी विभागात मनसेने आता शड्डू ठोकले आहेत. राजकीय मैदान पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी जोरदार तयारी करीत उत्तर रत्नागिरीत पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरत असून याच पार्श्वभूमीवर मनसेचा भव्यदिव्य मेळावा चिपळूण येथे १८ मे रोजी बड्या नेत्याच्या उपस्थित होत असून या मेळाव्यातून आगामी लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार असून शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असून साऱ्यांचे लक्ष या मेळाव्याकडे वेधले गेले असून उत्तर रत्नागिरीच्या राजकीय वातावरणला कलाटणी देणारा हा मेळावा होणार आहे.
जिल्ह्यात राजकीय वातावरण शांत आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचल घेतली आहे. उत्तर रत्नागिरी विभागात पक्ष बांधणी जोरदार सुरू आहे. जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी वरीष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पाच तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्याचा प्रयत्न केला असून याचाच प्रत्यय १८ मे रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून दिसून येणार आहे. मनसेचे नेते अविनाश अभ्यकर शिरीष सावंत, प्रकाश महाजन, अविनाश जाधव, अनिल खानविलकर, वैभव खेडेकर हे उपस्थित राहून मनसैनिकांना उर्जितावस्था देणार आहेत. मनसेची मधल्या काळात उत्तर रत्नागिरी विभागात काहीशी पीछेहाट झाली होती.
मात्र, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे या दोन पदाधिकाऱ्यांनी उत्तर रत्नागिरीत मनसेला आता मजबूत स्थितीत उभे केले आहे. यामुळेच हा भव्यदिव्य मेळावा चिपळूण येथील हॉटेल अतिथी येथे सकाळी ११ वाजता होत आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असून स्वतः जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे आणि त्यांचे सहकारी सचिन गायकवाड, विनोद जानवलकर, संजय आखाडे, संदेश साळवी, सुनील हळदणकर, निलेश बामणे, नितीन साठे, नवज्योत गौड, राजेंद्र गोजारी, ऋषिकेश कानडे, अभिजित रायकर हे मेहनत घेत आहेत. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होणार आहे. वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते मनसेत सक्रिय होणार असल्याने मनसेमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 07/May/2025














