रत्नागिरी : नारळ पिकातील उत्कृष्ट कार्य केले असेल, अशा शास्त्रज्ञ बागायदार, उद्योजक किंवा कलाकार यांना कै. सुनंदा आणि शंकर महादेव भाटकर कल्पवृक्ष मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे.
२०२४-२५ या दोन वर्षातील मानांकनासाठी १३ मे दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करावे, असे आवाहन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये कृषी विद्यावेत्तांनी केले आहे. पुरस्कारासाठी उमेदवारांनी संस्थेने शिफारस केलेले अर्ज प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक नारळ संशोधन केद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 07-05-2025













