मुंबईत अवकाळीच्या सरी; रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात 7 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे मध्ये पाऊस पडल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली

या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर दहा ते पंधरा मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले.

ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या दररोजच्या तुलनेमध्ये बुधवारी गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

वसई विरारमध्ये सायंकाळी ही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. अवकाळी पावसामुळे वसई विरारमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर वसईच्या बागायतीचंही नुकसान झालं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 08-05-2025