रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ. तब्बल चार वेळ उदय सामंत हे या मतदारसंघातून निवडून आलेत. २००४ आणि २००९ साली ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते तर २०१४ आणि २०१९ साली ते शिवसेनेकडून निवडून आले होते. प्रत्येकवेळी त्यांचे मताधिक्य हे वाढत जाणारे होते. मात्र आता शिवसेना फुटल्यावर सर्वच राजकीय गणिते बदलल्याचे दिसत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणूचा अनुभव लक्षात घेत त्या त्या पक्षाच्या विद्यमान मतदार संघांवर दावा करण्याच्या भूमिकेत भाजप दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एकही विधानसभेची जागा भाजप लढवणार नसल्याचे बोलले जात असताना भाजप चे नेते बाळ माने मात्र वेगळ्या पावित्र्यात असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीची जागा शिंदे गटाच्या वाट्याला जाणार हे निश्चित असल्याने बाळ माने हे उबाठा मधून निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसातच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 10-10-2024














