Pakistan PM Shahbaz Sharif On Operation Sindoor: ‘खून की हर बूंद का बदला लेंगे; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची दर्पोक्ती; रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला केले संबोधित

Pakistan PM Shahbaz Sharif On Operation Sindoor: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर (Pahalgam Terror Attack) करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तानात (Pakistan) घुसून तेथील तब्बल 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली.

यामध्ये पाकिस्तानात आसरा घेतेलेल्या अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यांतर पाकिस्तानात हाहाकार माजला. अशातच आता भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shahbaz Sharif) यांनी भाष्य केलं आहे. तसेच, याबाबत बोलताना पाकिस्तानी पंतप्रधानानं भारताला धमकीही दिली आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला रात्री उशिरा संबोधित केले आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार असल्याची धमकी शरीफ यांनी दिली आहे.

पाकिस्तानवर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला धमक्या द्यायला सुरूवात केली. भारतानं सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असा दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. तर भारताच्या 80 लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला, असाही दावा त्यांनी केला आहे. रात्रीच्या अंधारात शत्रू आला आणि आमच्यावर हल्ला करून निरपराधांना मारून गेला, असंही शरीफ यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. तसेच, पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिलंय आणि काही तासांतच भारताला माघारी धाडलं. तसेच, शरीफ यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये तब्बल 37 पाकिस्तानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचंही कबूल केलं. तसेच, 40 हून अधिक जण जखमी झाल्याचंही सांगितलं. शरीफ यांनी संसदेत बोलताना भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शहीद’ म्हणून संबोधलं.

पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. “भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. आम्ही काल रात्री सिद्ध केलंय की, पाकिस्तानला जशास तसं उत्तर कसं द्यायचं, हे माहीत आहे.”

पाकिस्तानी पंतप्रधानांचा कबुलीनामा

आदल्या दिवशी, शाहबाज शरीफ यांनी संसदेत भाषण करताना भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसान मान्य केलं होतं. त्यांनी दावा केलेला की, काल रात्री आम्हाला प्रत्येक क्षणाचे अपडेट्स मिळत होते. काल रात्री भारत पूर्ण तयारीनिशी आलेला आणि त्यांनी 80 लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील सहा ठिकाणांना लक्ष्य केलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज म्हणाले की, बुधवारी रात्री आमच्या ‘शत्रूनं’ रात्रीच्या अंधारात आमच्यावर हल्ला केला, पण, अल्लाहच्या आशीर्वादानं आमचं सैन्य त्यांना योग्य उत्तर देऊ शकलं. त्यांनी सांगितलं की, या हल्ल्यात मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अल्लाह त्याला माफ करो आणि स्वर्गात जागा देवो.

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली, भारतानं घाईघाईनं कारवाई केली आणि भारतीय माध्यमांनी पाकिस्तानवर निराधार आरोप करायला सुरुवात केली की, त्या हल्ल्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत.

भारतानं आमची ऑफर स्वीकारली नाही…

पाकिस्तानी संसदेत भाषण करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललो आहोत, पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली, तेव्हा मी स्वतः तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केलेलं की, या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, पण भारतानं आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, 22 एप्रिलपासून जवळजवळ दररोज आम्हाला हल्ला होणार असल्याची माहिती मिळत होती. त्यांनी धमकी दिली की, जेव्हा जेव्हाही कोणतीही चिथावणी दिली जाईल, तेव्हा आमचे सैन्य चोवीस तास प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असेल.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 08-05-2025