राजापूर : हातदे येथे १० ते ११ मे रोजी क्रिकेट स्पर्धा

पाचल : हातदे पाटीलवाडी येथे सालाबादप्रमाणे १० ते ११ मे रोजी ३३ व्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाटीलवाडी प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप सखाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ विजेत्या स्पर्धकांना चषक देण्यात येणार आहे.

पाटीलवाडी स्थानिक ग्रामस्थ आणि रामेश्वर क्रीडा मंडळ मुबंई हातदे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तांबटीचा माळ येथील मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रूपये ५० हजार रूपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक २५ हजार रूपये व आकर्षक चषक, त्याचप्रमाणेउत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी स्वतंत्र चषक, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक आणि प्रथम व द्वितीय क्रमांक संघातील सर्व खेळाडूना पदक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. १० मे रोजी रात्री ८ वाजता पाटील प्रीमियर लीग ही अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 08/May/2025